मुंबईत भरधाव मर्सिडीजने एकास चिरडले

मुंबई – मुंबईतील महालक्ष्मी परिसरात सोमवारी रात्री मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघातात  एक जण ठार झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचं कारवरील ताबा सुटल्यानं मर्सिडीज कार (E350) दुसऱ्या लेनमधून येणाऱ्या BMWवर जोरदार धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या के.के. मार्गावरील हा अपघात आहे. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उपचारादरम्यान एक जण ठार झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.