नवी दिल्ली – दिल्लीतील सनलाईट कॉलनी परिसरातील बस स्टॉपवर एका मनोरुग्ण महिलेवर सामुदायिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडीत महिलेने दिलेल्या लेखी जबाबामध्ये तिने म्हटलय की तिला जेवण देण्याचे अमिष दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान, या अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही, आमचा तपास सुरू असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.