इंग्लंडच्या खेळाडूंची मानसिक आरोग्य तपासणी

लंडन – करोना साथीच्या कालखंडात बायोबबल वातावरणात सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार आहे.

करोनामुळे जगभरात क्रिकेट ठप्प झाले होते. त्यावेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जुलैमध्ये क्रिकेटला प्रारंभ इंग्लंड हा पहिला संघ ठरला होता. ते वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळले होते.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी काही खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले होते. पुढील कोणत्याही दौऱ्याला जाण्यापूर्वी खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा आढावा घेतला जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.