कौटुंबिक न्यायालयाने मंजुर केला पतीचा घटस्फोटाचा अर्ज
पुणे – लग्नानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवणे क्रुरताच असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने पतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी मंजुर केला. तसेच पत्नीचे नात्यातील व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे फोनच्या चॅटवरून लक्षात आणून दिल्याचे कारणही घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. माधवच्या वतीने न्यायालयात ऍड. के.टी.आरू-पाटील, ऍड.केदार केवले आणि ऍड प्रज्ञा गुरसळ यांनी बाजू मांडली. दोघांचा विवाह एप्रिल 2020 मध्ये झाला.
त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली. मात्र, तिने पतीसोबत शरीर संबध ठेवण्यास नकार दिला. ती वारंवार माहेरी जात असत. पतीला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येत होता. दरम्यान पत्नीचे नात्यातील व्यक्तीसोबतच चॅटींग मिळाले. दरम्यान काही कालावधी गेल्यानंतर पत्नी पळून गेली. जाताना चिठ्ठी लिहली होती. त्या चिठ्ठीद्वारे पतीने पोलिसात पत्नी हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यावेळी “मी मर्जीने घर सोडून गेले होते.
नात्यातील व्यक्तीसोबत दोन दिवस लॉजवर राहिले. मला पतीबरोबर संसार करायचा नाही’ असा जबाब दिला. तर त्या नात्यातील व्यक्तीने दोघे सोबत गेल्याचा जबाब दिला. त्यामुळे पतीने मानसिक क्रुरताच्या कारणाखाली घटस्फोट मिळण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी पत्नी आणि त्या नात्यातील व्यक्तीचे अश्लील चॅट न्यायालयात दाखल करण्यात आले.
लग्नानंतर पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे. तसेच, नात्यातील व्यक्तीसोबत असलेले संबंध हे मानसिक क्रुरता असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने घटस्फोट मंजुर केला.
के.टी.आरू-पाटील, पतीचे वकील.