Men’s Junior Asia Cup 2024 (IND vs PAK Final) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक रंजक सामना रंगणार आहे. पुरुष कनिष्ठ आशिया चषक 2024 चा अंतिम सामना बुधवारी होणार आहे. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. टीम इंडिया पूल-ए (Group-A) चा भाग होती. संघानं चार सामने खेळले आणि सर्व जिंकले. तर पाकिस्तानी संघ पूल-बी चा भाग होता. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील लढतीत विजय मिळवताना अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदासाठी दोघेही लढतील. चाहत्यांना हा सामना मोफत पाहता येणार आहे. त्याविषयी जाणून घेऊया….
फायनल कधी आणि कुठे मोफत पाहता येईल?
पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकात पाकिस्तानचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना हा सामना मोफत पाहता येणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हॉकी इंडिया ॲप डाउनलोड करावे लागेल. यासाठी हॉकी इंडियाने X वर एक पोस्टही शेअर केली आहे. थेट सामने पाहण्यासोबतच स्कोअरकार्डही ॲपवर पाहता येणार आहे.
🚨 Don’t miss the ultimate clash! 🚨
India 🆚 Pakistan – where rivalries ignite and legends are made🏑🔥Stay closer to the game like never before with our official app 📱✨
👉 Scan the QR code to download now and:
✅ Watch live action
✅ Track scores in real-time
✅ Get all the… pic.twitter.com/XCPLRRY408— Hockey India (@TheHockeyIndia) December 4, 2024
गतविजेत्या भारताने पुरुष कनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी रात्री झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने पहिल्या सेमीफायनलमध्ये जपानचा 4-2 असा पराभव करताना आगेकूच केली आहे.
Let’s cheer for our nation and bring the trophy home!
Follow the Clash of the Titans live on the Hockey India League app tonight!
Scan the QR code and join the Roar of the Indian fans! #HIL2024 pic.twitter.com/RvgYsPpDMg— Hockey India League (@HockeyIndiaLeag) December 4, 2024
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना आज रात्री 8.30 वाजता होणार आहे. टीम इंडियाने पुरुष ज्युनियर आशिया कप 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. संघानं जपान, कोरिया, थायलंड आणि चायनीज तैपेईचा पराभव केला.
टीम इंडियाने यावेळी स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. अंतिम फेरीत त्याचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानी संघानं देखील एकही सामना गमावलेला नाही. पाक हॉकी संघाने 4 सामने खेळले आणि सर्व जिंकले. त्यांनी मलेशिया, बांगलादेश, चीन आणि ओमानचा पराभव केला.