वाजपेयींच्या काही रंजक गोष्टी…

-मुत्सदी, चाणाक्ष, वक्‍ते आणि कवी, देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले होते.त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अस्त झाला.

– अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र कायदे विषयांच शिक्षण घेतले. अटल बिहारी वाजपेयी वडिलांसोबत एकाच हॉस्टेलमध्ये राहत होते.

– 1942 मधील ऑगस्ट क्रांतीच्या वेळी वाजपेयी बालसुधारगृहात गेले होते.

– संघाचे मुखपत्र चालवण्यासाठी त्यांनी कायद्याच्या शिक्षणाला रामराम ठोकला.

– पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विरोध करण्यासाठी वाजपेयी बैलगाडीने संसदेत गेले होते.

– संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीमध्ये भाषण करणारे वाजपेयी हे पहिलेच भारतीय होते. ओजस्वी वाणी, अस्खलित राष्ट्रभाषा, शब्दांवरची पकड अटलजींनी जनसंघाच्या सदस्यांना एकत्र काम करण्याचे आवाहन करताना भारताच्या थोर संस्कृतीचे काव्यमय वर्णन त्यांनी केले होते.

– अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होतील, असे भाकित जवाहरलाल नेहरु यांनी वर्तवले होते.

– राजकीय कारकीर्दीत वाजपेयी केवळ एकदाच निवडणुकीत पराभूत झाले होते.

– पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले कॉंग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान आहेत.

– संपूर्ण राजकीय कारकीर्दीत 10 वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले.

– चार मतदारसंघांमधून लोकसभा खासदार झालेले ते एकमेव राजकीय नेते आहेत.

– वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून त्यावेळी शपथ घेतली. भाजपा चार दशक सतत विरोधीपक्षात राहिल्यानंतर १९९६ मध्ये वाजपेयी हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. कोणत्याही खासदाराला लाच न देता त्यांनी परिस्थितीचा सामना केला. तेव्हा अटलजी भाषणात म्हणाले होते, ‘बाजारमे घोडे बहोत है ! लेकीन कोई खरीदार नही!’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.