दुबई – आयसीसीच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय टी २० संघात भारताच्या एकाही पुरुष खेळाडूला स्थान मिळालेले नाही. मात्र, महिला संघात स्मृती मानधनाला हा मान मिळाला आहे. भारताची मानधना एकमेव खेळाडू असली, तरी इंग्लंडच्या सर्वाधिक खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडचीच नॅट श्रायव्हर हिला कर्णधार करण्यात आले आहे.
आयसीसीने आज दोन्ही संघांची घोषणा केली. मानधना टी २० क्रिकेटमध्ये भारतीय संघाची उपकर्णधार असून तिने गेल्या वर्षी ३१.८७च्या सरासरीने सर्वाधिक २५५ धावा केल्या आहेत.
एकही भारतीय नाही
पुरुष संघात मात्र एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश असून, त्यांच्याच बाबर आझमला कर्णधार करण्यात आले आहे. महंमद रिझवान आणि शाहिन आफ्रिदी हे अन्य दोन पाकिस्तानी खेळाडूंचा संघात समावेश आहे.
संघ –महिला – स्मृती मानधन (भारत), टॅमी बीऔमॉंट, डॅनी व्याट, नॅट श्रायव्हर (कर्णधार), एमी जोन्स, सोफी एक्लेस्टोन (सर्व इंग्लंड), गॅबी लेविस (आयर्लंड), ल़ॉरा वोल्वार्डट, मरिझाने कॅप, शबनीम इस्माईल (तिघी दक्षिण आफ्रिका), लॉरिन फिरी (झिंबाब्वे),
पुरुष – जोस बटलर (यष्टिरक्षक), महंमद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), शाहिन आफ्रिदी (तिघे पाकिस्तान), एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ताबारेझ शम्सी (तिघे दक्षिण आफ्रिका), मिशेल मार्श, जोश हेझलवूड (दोघे ऑस्ट्रेलिया), वानिंदू हसरंगा (श्रीलंका), मुस्तफीझूर रहमान (बांगलादेश)