गरज भासेल तेंव्हा रक्‍तदानासाठी सदस्य तयार : डॉ. परदेशी

नगर -करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून प्रतिष्ठानतर्फे करोनाच्या नियमांचे पालन करत प्रतिष्ठानच्या रक्तदात्यांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान केले आहे. यापुढील काळात जेव्हा-जेंव्हा रक्ताची गरज भासेल. त्यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य रक्तदानासाठी तयार असतील, असे प्रतिपादन वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र किरणसिंग परदेशी यांनी केले.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास प्रतिष्ठान आणि जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष विजय परदेशी, प्रदीप परदेशी, वेदपालसिंह तन्वर, आनंद परदेशी, सचिव दीपक परदेशी, आकाश परदेशी, सौरभ चंदेल, शिवानी गहिले, गायत्री चंदेल, महेश दीक्षित, अजयसिंग ठाकूर आदिंनी रक्तदानात सहभाग घेतला. डॉ. तन्वर यांनीही मार्गदर्श केले. रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, मुकेश साठ्ये, प्रकाश स्मार्त, डॉ. विलास मढीकर, सोनाली खांडरे यांनी सहकार्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.