करोनाच्या चाचणीकरिता नटराज मंडळाचे सदस्य प्रशासनाच्या मदतीला

नटराज मंडळाच्या सदस्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

बारामती : शहरातील नागरिकांची गुरुवार (दि.16)पासून नगर परिषदेच्या वतीने घरोघरी जाऊन करोनाची चाचणी घेतली जात आहेत. यामध्ये प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नटराज नाट्य कला मंडळाचे सदस्य प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी कार्यात सहभागी झाले आहेत. नटराजचे अध्यक्ष किरण गुजसर यांनीही नागरिकांची थर्मल मीटरद्वारे तपासणी केली.

नटराजचे सदस्य अमर महाडिक, सचिन आगवणे, दीपक मुळे, श्रीकांत गालिंदे, अक्षय महाडिक, विनय आगवणे, मलिकार्जुन हिरेमठ, सचिन होळकर हे सहभागी होते.

यामध्ये नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी जनजागृती करणे. तसेच यामध्ये ज्या नागरिकांना लक्षणे आढळतात. त्यांना शारदा प्रांगण शाळा नं ७ येथील तपासणीसाठी घेऊन जात होते. यामध्ये करोना पॉझिटिव्ह सापडतील अशा नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात व यातील लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची सोय नटराजच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.