पुणे: मेलन, सायबेज, टिएटो या संघानी प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पहिल्या लढतीत बीएनवाय मेलन संघाने आयरिसर्च संघावर चार गडी राखून मात केली. मेलन संघाने आयरिसर्च संघाला 18.2 षटकांत 127 धावांत रोखले. मेलन संघाने विजयी लक्ष्य 6 गडींच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पूर्ण केले.
दुसऱ्या लढतीत सायबेज संघाने इंडस टॉवर संघावर 74 धावांनी विजय मिळवला. सायबेज संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 162 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना इंडस टॉवरचा डाव 88 धावांतच संपुष्टात आला. यानंतर टिएटो संघाने टिया संघावर, तर डसॉल्ट संघाने हरबिंजर संघावर मात केली.