नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेला भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विकास केलेल्या शाळेची सफर त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही देशाचे झेंडे हाती घेऊन स्वागत केलं.
विद्यार्थ्यांनी निर्भिड, सक्षम, स्वसंरक्षण करणारं व्हावं, त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, कोणत्याच क्षेत्रात विद्यार्थी कमी पडू नये यासाठी केजरीवालांनी 2018 मध्ये हॅपिनेस करीक्युलम या कार्यपद्धतीची आखणी केली होती. या कार्यपद्धतीनुसार दिल्लीती प्राथमिक शाळेचा कारभार चालतो.
शाळेतील विद्यार्थ्यांशी मेलेनिया यांनी संवाद साधला. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला. या सारख्या शालेय कार्यपद्धतीची आखणी फक्त अमेरिकेतच नाही तर सगळ्या जगात व्हायला हवी, असं त्यांनी सांगितलं.
हा माझा पहिला भारत दौरा आहे. ज्या पद्धतीनं आमचं सगळीकडे स्वागत केलं जात आहे, आमची काळजी घेतली जात आहे. ते सगळं पाहून मी अवाक झाले आहे. खरंच भारतातील लोक फार प्रेमळ आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे.