मेहूल चोक्‍सीचाही फास आवळला; नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली – पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यास काहीही हरकत नसल्याचा निकाल ब्रिटनमधील न्यायालयाने दिला आहे. यांनतर आता या घोटाळ्यातील सहआरोपी असणारा नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्‍सीच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

कॅरिबियन देश “अँटिगा आणि बार्बुडा’ने नोव्हेंबर 2017 साली गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत मेहुल चोक्‍सीला कॅरिबियन देशांची नागरिकता बहाल केली होती. पण आता हे नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया अँटिगाने सुरू केली आहे. त्यामुळे मेहुल चोक्‍सीच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात चोक्‍सीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जबुडव्या मेहुल चोक्‍सी याचे नागरिकत्व गेल्या वर्षीच रद्द करण्यात आले होते, अशी माहिती सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिली आहे. पण यानंतर चोक्‍सीने नागरिकत्व मागे घेण्याच्या निर्णयाविरोधात अँटिगाच्या कोर्टात खटला दाखल केला होता. सध्या हा खटला न्यायप्रविष्ट आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.