मुंबई – सिंघम फेम अभिनेत्री “काजल अगरवाल” आज विवाहबंधनात अडकणार आहे. स्वतः काजल अगरवालनेच सोशल मीडियावर ही न्यूज ब्रेक केली होती. आज 30 ऑक्टोबरला गौतम किचलूबरोबर काजल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
दरम्यान, काल (गुरुवारी) काजलचा मेहंदी आणि हळदीचा समारंभ पार पडला. सध्या तिच्या या समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मेहंदीसाठी काजलने पिवळ्या रंगाचा छानसा ड्रेस घातला होता. या सध्या लूकमध्येही ती अत्यंत सुंदर दिसत होती.
मुंबईत होणाऱ्या या विवाह समारंभात केवळ घरातील सदस्यच सहभागी होणार आहेत. करोनाच्या साथीमुळे लग्न धुमधडाक्यात करण्याच्या अपेक्षेला धक्का बसला आहे. त्यामुळे अगदी छोट्या समारंभातच लग्न करावे लागणार आहे.
काजल आणि गौतममधील हा विवाह अरेंज्ड-लव मॅरेज असणार आहे. गौतम किचलू हा एक इंटिरिअर डिजाईनर आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. लग्नानंतर काजलला सिनेमात काम करण्याची परवानगी त्याने दिली आहे.