मुंबई – अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या ‘मेहंदी’ या चित्रपटातून तिच्या पतीच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेता ‘फराज खान’ याचे आज निधन झाले. तो 46 वर्षांचा होता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मुळे त्रस्त असलेला फराज वर बंगळुरु येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
With a heavy heart I break the news that #FaraazKhan has left us for what I believe, is a better place.Gratitude to all for your help & good wishes when he needed it most.Please keep his family in your thoughts & prayers.The void he has left behind will be impossible to fill 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) November 4, 2020
बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पूजा म्हणाली कि, “मी जड अंत:करणाने आपल्या सर्वांना ही बातमी देतेय की, फराज खानने हे जग सोडले आहे. आपण केलेल्या सर्व मदतीसाठी आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रर्थानांनबद्दल धन्यवाद. जेव्हा त्याच्या कुटुंबाला मदतीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा, आपण सगळे मदत करण्यासाठी पुढे आलात. आता त्याच्या आत्म्याला सती मिळावी म्हणून प्रार्थना करा. फराजच्या जाण्याने मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे,” असं पूजा म्हणाली.
फराजच्या मदतीसाठी सलमानचा मोठे पणा –
फराजची मृत्यूशी झुंज सुरु असताना बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, अभिनेता सलमान खान त्याच्या मदतीला धावला. दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठी सलमानला ओळखले जाते. सलमानने फराज खानच्या संपूर्ण हॉस्पिटल आणि ट्रिटमेंटचा खर्च केला. अभिनेत्री कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.