नवी दिल्ली – मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा ( CM Conrad Sangma ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोनराड संगमा यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
Meghalaya CM Conrad Sangma tests positive for #COVID19. He is under home isolation and experiencing mild symptoms. pic.twitter.com/KdTHKsZFIh
— ANI (@ANI) December 11, 2020
मुख्यमंत्री संगमा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझा कोरोना ( COVID19 ) चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने मी स्वत:ला आपल्या घरातच आयसोलेट करून घेतले आहे. तसेच गेल्या पाच दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री संगमा यांनी केले आहे. तसेच घरीच राहा आणि सुरक्षित रहा असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.