मुंबई – गौतमी पाटील हे नाव सध्या चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. आता यावरूनच बिग बॉस फेम मेघा घाडगे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लावणीवर भाष्य केलं.
मेघा घाडगे यावेळी म्हणाल्या,सुरेखा पुणेकर आणि मी जेव्हा काम करत होते तेव्हडाच काळ लोकांनी लोककला पाहिली असं वाटत. आताच्या मुलींनी मात्र जो व्यवसाय करून ठेवलाय आम्हीही व्यावसायिक कलावंतचं म्हणून काम केले पण त्याचीही एक मर्यादा आहे. आताच्या पिढीला लावणी इतकी सोपी वाटू लागली आहे की ते वाटेल तसे घाणेरड्या पद्धतीचे हावभाव करतात हे सांगताना देखील त्रास होतो असं स्पष्ट मत यावेळी मेघा घाडगे यांनी व्यक्त केलं.
अनेक कलावंतांच काम गेलं पण तरीही ते आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले त्यांनी कोणत्याही घाणेरड्या पद्धतीने काम केलं नाही कारण त्यांना ती कला माहिती आहे असंही घाडगे यावेळी म्हणाल्या. लावणीच्या नावाखाली सध्या सुरु असलेल्या थिल्लर डान्सबाबत घाडगे यांनी आपला आक्षेप नोंदवला.
लावणीबाबत खंत व्यक्त करत म्हणाल्या…
महाराष्ट्रातील मात्र गणपती, दहीहंडी आणखी कोणत्याही जयंती असू दे या कार्यक्रमांना अशा मुलींना नाचवलं जातं.
घागरा चोली घालून अंगप्रदर्शन करणे, लावणीत तर आता पदर घेणंच बंद झालं आहे.
गळा इतका खाली असतो, केस मोकळे सोडून बिनधास्त नाचतात, कमरेखाली साडी इतकी गेलेली असते की आम्हालाच लाज वाटते.
यामुळे शरमेने डोकं फोडून घ्यावं अशी परिस्थिती या क्षेत्रात झाली आहे.