पुणे – महापालिकेतील विभागप्रमुखांना त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली असून, या जागांवर पुढील महिन्यात मेगाभरती होणार आहे. आठवडाभरात ही माहिती देण्याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना केल्या आहेत.
शहराच्या दैनंदिन व्यवस्थापनात आणि विकासकामांमध्ये गरज असलेल्या इंजिनियर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता असून, सध्या असलेल्या मनुष्यबळावर कामाचा ताण येतो. महापालिकेचा आकृतिबंध मंजूर झाला असला तरी, कर्मचारी भरतीबाबत प्रशासन सावध पावले उचलत आहे. इंजिनियर्सची 347 पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेत 200 इंजिनियर्ससह आरोग्य, व्यवस्थापन विभागामध्ये कायमस्वरूपी आणि अग्निशमन दलासाठी 200 जवानांची कंत्राटी भरती केली जाणार आहे.
पुणे, दि. 12 – महापालिकेतील विभागप्रमुखांना त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली असून, या जागांवर पुढील महिन्यात मेगाभरती होणार आहे. आठवडाभरात ही माहिती देण्याविषयी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना
केल्या आहेत.