हडपसर – श्रद्धा असेल तर बेताल वक्तव्य मुखातून बाहेर पडणार नाही, महापुरुषांची बदनामी करणारे प्रशिक्षण साडेतीनशे वर्षांपासून आज तागायत दिले जात आहेत. ते रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी व एक दिवस महापुरुषांच्या सन्मानासाठी बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आमदार चेतन तुपे यांनी बैठकीमध्ये आव्हान केले.
महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता मंगळवारी १३ तारखेच्या पुणे बंदच्या हाकेला हडपसर मधील सर्व संघटना, सामजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी हडपसर माळवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील जिम्नेशन हॉलमध्ये बैठका घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
याबाबत हडपसर साधना विद्यालयमध्ये सर्व सामाजिक संघटनेचा प्रतिनिधीची बैठक आयोजित केली होती. हडपसर भाजी मंडई व्यापारी मंडळाने ही बैठक घेऊन १३ तारखेला बंद मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर वानवडी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले.