सातारा (प्रतिनिधी) : सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची शुक्रवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये भेट झाली. विशेष म्हणजे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केल्यानंतर झालेली ही पहिली भेट आहे.
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली होती.
या निवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर खा. पाटील आणि खा. उदयनराजे भोसले यांची थेट भेट झाली नव्हती. उभयंतांमध्ये टीकाटिप्पणी पण झाली होती.
महाराष्ट्र सदनात शुक्रवारी उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्या भेटीत सातारा जिल्ह्याची विविध विकास कामे व प्रश्न संसदेत मांडून पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या दोघांची झालेली भेट आणि त्यांच्यात झालेली चर्चा जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीसाठी उपयुक्त पडेल,अशी अपेक्षा आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा