सह्याद्री अतिथीगृहात विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक

मुंबई : राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून द्यावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि खासदार शरद पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना बँकाकडून होणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ज्या प्रकल्पांचे काम मुंबईत सुरु आहे त्या प्रकल्पांना बँकांनी आर्थिक पाठबळ दिल्यास पुनर्वसनाच्या कामाला गती मिळेल. तसेच सर्वसामान्य गरीब माणसाला त्याचे हक्काचे घर लवकर मिळण्यास मदत होईल.

यादृष्टीने म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची स्वतंत्रपणे भेट घेऊन येत्या आठ दिवसात यासंबंधीचा सुनियोजित आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या.

यावेळी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, म्हाडाचे  उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर  यांच्यासह  अनेक बँकांचे प्रमुख उपस्थित होते.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे  अध्यक्ष रजनीशकुमार, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक  संजीव चढ्ढा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अतनूकुमार दास, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी पालव मोहपात्रा, युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राज किरण राय आदींचा समावेश होता.

udhav

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.