मुंबई – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी “एक्झिट पोल’च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या “एनडीए’च्या मंत्रिमंडळाने आपले “पंतप्रधान’ नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल मंत्रिमंडळाचे आभार मानले.
राजधानीतील हॉटेल ‘अशोका’मध्ये बैठक -ही बैठक केवळ एनडीएची नसून मनामनांची बैठक आहे. आपली सर्वांची मने जोडणारीच ही बैठक आहे. एकीकडे विरोधी पक्ष अजूनही त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार शोधत आहेत, तर आम्ही मात्र निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून जाहीर केले आहे ! pic.twitter.com/p1IQ2WS5OV
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) May 22, 2019
दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल (मंगळवारी) ‘एनडीए’च्या घटक पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी खास पुरणपोळीचा बेत केला. या पुरणपोळीच्या भोजनानंतर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केले की, ‘राजधानीतील हॉटेल ‘अशोका’मधील बैठक केवळ एनडीएची नसून मनामनांची बैठक आहे. आपली सर्वांची मने जोडणारीच ही बैठक आहे. एकीकडे विरोधी पक्ष अजूनही त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार शोधत आहेत, तर आम्ही मात्र निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून जाहीर केले आहे.’