नवी दिल्ली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुका, महाराष्ट्रातील अतिवृष्टी यांसह अन्य विषयांवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान गोव्याचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो हे देखील उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. “केंद्रीय गृहमंत्री व आमचे नेते अमित शाह यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी गोव्याचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांच्या उपस्थितीत गोवा विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहा यांचे मार्गदर्शन घेतले.”
“अमित शहा यांनी यावेळी महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबाबत विशेषतः मराठवाड्यावर अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटाबाबत सर्व माहिती घेतली.” असं देखील फडणवीस यांनी ट्विटद्वारे सांगितले.
पुढील वर्षाच्या (२०२२) सुरुवातीसच गोव्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपपुढे यंदा काँग्रेस, आम आदमी पक्ष व तृणमूलच्या आव्हान असणार आहे.
Met our leader, Hon Union HM @AmitShah ji to brief and to seek guidance for #GoaAssemblyElections in New Delhi yesterday. Goa Minister @MichaelLobo76 too joined.
Hon Amit Bhai also took detailed information on recent #MaharashtraRains & flood situation especially in Marathwada. pic.twitter.com/Xh9HSH5LMb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 30, 2021