नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत आणि तीनही लष्करी दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा आढावा घेण्यात आला.
चर्चेचा आढावा आणि लष्कराची मोठ्या लढ्यासाठी असणारी तयारी, त्याचे भविष्यातील नियोजन यासाठी ही बैठक आयोजित केली होती, या बैठकीत देशासमोर असणाऱ्या समस्यांबाबतच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
ही बैठक सुमारे तासभर बैठक झाली. रावत यांनी भविष्यातील योजनांची माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.