पणजी – महाराष्ट्र बॅंकेद्वारा छोट्या उद्योगांचा इतर उद्योगाशी संबंध वाढावा याकरिता एक मेळावा आयोजित केला. मेळाव्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, महाराष्ट्र बॅंकेच्या गोवा विभागाच्या महाव्यवस्थापक नर्मदा सावंत, बॅंकेचे गोवा विभागाचे उप महाव्यवस्थापक आनंद शंकर उपस्थित होते..
यावेळी टम्टा म्हणाले की, देशाच्या विकासात लघु उद्योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
छोट्या उद्योगांना पुरेसे आणि वेळेवर कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र बॅंक वेळोवेळी पुढाकार घेत असते. छोट्या उद्योगाच्या अडचणी समजून घेता याव्यात याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे प्रश्न कमी व्हावेत याकरिता छोट्या उद्योगांच्या प्राप्तीच्या इ- डिस्काउंटिगसाठी एक वेगळा विभाग सुरू करण्यात आला आहे.