भारत आणि चिनी लष्करी अधिकाऱ्यांची लडाखमध्ये बैठक

श्रीनगर- भारतीय आणि चीनच्या सीमेवरील लष्करी अधिकाऱ्यांची आज पूर्वलडाखमध्ये बैठक झाली. संरक्षण प्रवक्‍त्यांनी ही माहिती दिली. भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व फायर ऍन्ड फ्युरी कॉर्पच्या मेजर जनरल अरविंद कपूर यांनी केले. तर चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व वरिष्ठ कर्नल गेन वेई हान यांनी केले, असे कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. दौलत बेग ओल्डी येथे मंगळवारी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही बैठक झाली होती, असे प्रवक्‍त्यांनी सांगितले.

सीमा भागात शांतता आणि सौहार्दाची स्थिती कायम राखण्यावर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या बैठकीच्यावेळी विशेष भर दिला. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळातील सदस्यांनी राष्ट्रध्वजांना मानवंदनाही देण्यात आली आणि शुभेच्छापत्रांचे आदान प्रदानही करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.