लबाड आवतानांना बळी पडू नका – कोल्हे

दिलीप मोहिते यांच्या प्रचारार्थ कडूस येथे सभा

राजगुरूनगर – पाच वर्षे सरकार असताना काही करता आले नाही. आता म्हणे 10 रुपयात थाळी देणार. हे लबडाचे आवातान आहे. मतदारांनी या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचाराची कडूस येथे सभा झाली, त्यावेळी कोल्हे बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद बाबा राक्षे, अशोक शेंडे, युवा नेते ऋषिकेश पवार नंदा सुकाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, महिला अध्यक्षा संध्या जाधव, प्रताप ढमाले, शांताराम देशमुख, अरुण मुळूक, बाळासाहेब धायबर, किसन चेहेरे, देविदास शिंदे, बंडू नेहेरे, निवृत्ती नेहेरे, कांचन ढमाले, निवृत्ती नेहेरे, दामू बंदावणे, माऊली ढमाले, अरूणा ढमाले, सुलभा चिपाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कडूस परिसरातील नागरिक उपस्थित होते

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, दहा वर्षे दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्‍याचा विकास साधला म्हणून विकासाची फायनल मारायची असेल तर पुन्हा दिलीप मोहिते याना संधी दिली पाहिजे.या पूर्वीच्या खासदारांनी बैलगाडा प्रश्‍न संसदेत का मांडला नाही.असा सवाल करीत अशा निष्क्रिय खासदारांना जनतेने घरी बसवले. तसेच खेडच्या प्रश्‍न न सोडविणाऱ्या येथील निष्क्रिय आमदारांना घरचा रस्ता दाखवल पाहिजे. खेडच्या सर्वांगीण विकासासाठी दिलीप मोहिते पाटील यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

जनतेने संधी देऊनही पाच वर्षांत काही कामे करत आली नाहीत. असे निष्क्रिय आमदार आता जनतेच्या मनामनातून उतरले आहेत. आम्ही पाच वर्षे बाजूला जाऊनही आमच्या बद्दल जनमत आहे.कारण आम्ही तालुक्‍यात जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होतो. तालुक्‍यात किती विकासकामे केली हे जनतेला माहित आहे. म्हणे लोकप्रतिनिधी संयमी आहे हे कसले संयमी आता लोकांचा संयम संपला आहे. आता लोकांनी ठरवलंय आणि आमचं पण ठरली यांना घरी पाठविणारच. तसेच बीजेपी ने उमेदवार उभा केला आहे. शिवसेना भाजप आता तालुक्‍यात भांडत बसले आहेत. विकासावर कोणही बोलत नाहीत. तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीला मतदान करा.
– दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.