Meera Borwankar : राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यापासून अद्याप या पदावर कोणाचीही नियुक्ती झाली नाही. यानंतर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड करण्याची मागणी अनेकांकडून करण्यात आली. याचदरम्यान, माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सरकारच्या निर्णयाचे अनेकांकडून कौतुकही करण्यात आले. परंतु अद्याप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड झालेली नाही. Donald Trump on iran: “मी तुम्हाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकीन” ; अमेरिकी जहाजांवर इराणने केलेल्या हल्यानंतर ट्रम्पची आक्रमक धमकी मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबतच्या सर्व बातम्या खोट्या (Meera Borwankar) मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने दिली आहे. मीरा बोरवणकर यांच्या निवडीबाबत कुठलाही अधिकृत निर्णय झाला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. (Meera Borwankar) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने याबाबत फॅक्ट चेक केली आहे. “मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड’ अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही. तशा आशयाच्या सर्व बातम्या निराधार आहेत,” असे विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. Meera Borwankar दरम्यान, मीरा बोरवणकर यांच्या नावाबाबत सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या बातमीत कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. कोण आहेत माजी IPS मीरा बोरवणकर? (Meera Borwankar) माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर या 1981 मध्ये महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला IPS ठरल्या. त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना ठसा उमटवला. 1994 मध्ये जळगाव सेक्स स्कँडल उघडकीस आणून त्या चर्चेत आल्या. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये चढ्ढा कुटुंबात जन्मलेल्या मीरा बोरवणकर आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राशी जोडल्या गेल्य. (Meera Borwankar) मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डविरोधात कडक कारवाई केली. दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांवर कारवाई करून त्यांनी गुंडाराजाला आळा घातला. तसेच अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची यांसारख्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात त्यांचा वाटा होता. पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. तुरुंग महानिरीक्षक असताना याकूब मेमनच्या फाशीची प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली झाली. “लेडी सुपरकॉप” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर 2017 मध्ये निवृत्त झाल्या. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या. (Meera Borwankar) हेही वाचा: Raj Thackeray Post : त्याला हालहाल करत संपवा..! नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा संताप; राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावलं