State Women Commission : आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून मिळालेला अनुभव आता महिलांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी उपयोगी पडणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(State Women Commission) नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित वादामुळे रूपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. त्यानंतर आता या महत्त्वाच्या पदासाठी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, त्यांना या पदासाठी विचारणा देखील करण्यात आल्याची माहिती आहे. (State Women Commission) महिला आयोग हे महिलांचे हक्क, सुरक्षा आणि सन्मान जपण्यासाठी महत्त्वाचे संवैधानिक संस्थान आहे. आयोगाच्या अध्यक्षांना महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये ‘सुमोटो’ म्हणजेच स्वतःहून दखल घेण्याचा अधिकार असतो. मीरा बोरवणकर यांची कारकीर्द आणि कामगिरी पाहता त्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी अनेक स्तरांतून होत आहे. (State Women Commission) दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही वेळोवेळी मीरा बोरवणकर यांचे नाव पुढे करत त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. आता सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (State Women Commission) कोण आहेत माजी IPS मीरा बोरवणकर (Meera Borwankar) माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर या 1981 मध्ये महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला IPS ठरल्या. त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना ठसा उमटवला. 1994 मध्ये जळगाव सेक्स स्कँडल उघडकीस आणून त्या चर्चेत आल्या. (State Women Commission) मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदावर असताना त्यांनी अंडरवर्ल्डविरोधात कडक कारवाई केली. दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांवर कारवाई करून त्यांनी गुंडाराजाला आळा घातला. तसेच अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची यांसारख्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणात त्यांचा वाटा होता. (State Women Commission) तुरुंग महानिरीक्षक असताना याकूब मेमनच्या फाशीची प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली झाली. “लेडी सुपरकॉप” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरवणकर 2017 मध्ये निवृत्त झाल्या. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या. (State Women Commission)