“मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो”; अंगणवाडी सेविकेच्या देणगीला रोहित पवारांचा सलाम

मुंबई : राज्यात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सर्व यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांत  एका अंगणवाडी सेविकेने खारीचा वाटा उचलला आहे.  जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख  यांनी आपल्या एक महिन्याचा पगार  जामखेडमधील डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी म्हणून दिला.

राज्य सरकारकडे करोनासंबंधी उपाययोजनांसाठी निधीची कमतरता आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन करण्यात आले. अंगणवाडीसेविकेपेक्षा जास्त पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला होता. मात्र   मीनाताई शेख यांनी संपूर्ण महिन्याचा पगारच कोविड सेंटरला दिला.

दरम्यान, मीनाताईच्या दानतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याची दखल खुद्द जामखेड-कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी, “मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो” असे म्हटले आहे.

मुस्लिमांमध्ये पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच संपला. या महिन्यात उपवास (रोजे) ठेवले जातात. या काळात दान (जकात) करावे, असेही या धर्मात सांगितले आहे. आपल्या एकूण उत्पन्नातील काही भाग दान द्यायचे असते. याही उद्देशाने शेख यांनी आपला एक महिन्याचा पगार दिला आहे. मुळात अंगणवाडी सेविकांना पाच ते आठ हजार रुपये मानधन मिळते. तुलनेत हे दान अल्प आहे. मात्र, शेख यांच्या दृष्टीने महिन्याचा पगार म्हणून त्याची किंमत मोठी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.