औषधी दुधी भोपळा

दुधी भोपळ्यामध्ये दुधा इतकेच शरीरास आवश्‍यक असे पोषक घटक आहेत. म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. रोज आपण जो नियमित आहार घेतो, तो आपल्या शरीराला कोणत्या न कोणत्या प्रकारे फायद्याचा असतो.

दुधी भोपळा देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्यापैकी अनेकांना ही भाजी आवडत नसेल. पण या भाजीत प्रोटीन, फायबर, मिनरल्स, कार्बोहैड्रेटचे प्रमाण भरपूर असते.
1. जर आपण नियमित 1 ग्लास दुधी भोपळ्याचे रस प्यायल्यानं हाय बीपीची समस्या नियंत्रित राहील.
2. दररोज भोपळ्याचा रस प्यायल्याने बरेच तास आपले पोट भरल्या सारखे राहते व त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. दुधी भोपळा मीठ टाकून उकडून खाऊ शकता. भोपळ्यात फायबर अधिक असल्यामुळे भूक कमी लागते.
3. भोपळ्याचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
4. दुधी भोपळा हे शरीराला थंडावा देतो. दुधीच्या रसात अधिक मात्रेत पाणी असते जे आपल्या शरीराला थंड ठेवते.लघवी करताना जळजळ होत असेल, तर दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा.

 

5. कमी मसाला घालून भोपळा उकडून त्यांची भाजी खाल्ल्यास डीयुरेटिक, डिप्रेशन यावर लाभदायक आहे.
6. आहारामध्ये नियमितपणे दुधीचा वापर करावा. अनेक जणांना तसेच लहान मुलांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. अशा वेळी कोशिंबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप असे अनेक पदार्थ दुधी भोपळ्यांपासून बनवून त्यांचा उपयोग करावा.
7. रिकाम्या पोटी 1 ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. दुधीच्या रसात 98%पाणी आणि अँटिऑक्‍सिडंट असतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.

Leave A Reply

Your email address will not be published.