पसरणी घाटातील वैद्यकीय कचऱ्याची

प्रदूषण नियंत्रण विभागाकडून विल्हेवाट

वाई –
पसरणी घाटात बुवासाहेब मंदीर परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अज्ञातांनी कालबाह्य वैद्यकीय औषधांचा साठा रस्त्यावर टाकला होता. पर्यावरणास हानी पोहोचणाऱ्या या प्रवृत्तींविरोधात “प्रभात’मधून आवाज उठवण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेवून प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणची पाहणी करून हा कचरा वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रात जमा करण्याची व्यवस्था केली.

राज्यासह देश-विदेशातून लाखो पर्यटक वाईहून पाचगणी-महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणी येत असतात. घाटात दुर्मिळ प्रजातीच्या पशु-पक्ष्यांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. याठिकाणी रस्त्याच्या बाजूला कालबाह्य औषधांचा साठा टाकल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता.

मुख्य रस्त्यालगत सिरींज, प्लास्टिक पिशव्या, बॅंडेज मटेरियल, इत्यादी कचरा टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. दरम्यान दै. प्रभातमध्ये याबाबत प्रकाशीत झालेल्या वृत्ताची दाखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पसरणी घाटात घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून सदरचा वैद्यकिय संकलित करून सातारा येथील सोनापूर कचरा डेपोच्या वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रात पुढील प्रक्रियेसाठी जमा केला.

वैद्यकीय कचऱ्याची रीतसर विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण मंडळ मान्यताप्राप्त सामुदायिक वैद्यकीय प्रदूषण विल्हेवाट संस्था असून वैद्यकीय कचरा त्यांचाकडे सुपूर्द करावा. परंतु, काही हॉस्पिटल, डॉ. वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकताना दिसत आहेत. अवैधरित्या वैद्यकिय कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार आहे.

बी. एम. कुकडे – उपप्रादेशिक अधिकारी
(महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.