कोल्हापूर : करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरांमधील 9 झोपडपट्टीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोबाइल व्हॅनद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वैद्यकीय पथकाच्या टीम तयार करून देणेच्या सूचना काल आरोग्यधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे आजपासून ही वैद्यकीय सेवा वारे वसाहत, यादवनगर, विक्रमनगर, सदरबझार हौ.सोसायटी, कपूर वसाहत, गंजीमाळ, राजेंद्रनगर, मोरे माने नगर, जोशी नगर या झोपडपट्टीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे झोपडपट्टीमधील नागरिकांची जागेवरच तापाची तपासणी करून औषध उपचार करण्यात आली.