पुणे : इंडियन रेडक्रॉस संघटनेच्या पुणे शहर शाखे तर्फे पद्मावती भागातील ज्येष्ठ नागरीकांसाठी वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नमो ज्येष्ठ नागरीक संघ व सुखकर्ता सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या मदतीने इंदिरा गांधी सोसायटीत ढोबळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात सुमारे 250 लोकांची तपासणी करण्यात आली.
त्यांचे स्क्रीनींग आणि अन्य वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधे आणि मास्क देण्यात आले. डॉ. राजकुमार शहा, डॉ वंदना टाकणे, यांनी तपासणी केली. उद्घाटन प्रसंगी पोलिस निरीक्षक विजय पुराणिक, सतीशचंद्र कांकरीया, प्रमोद बनसोडे, विक्रम फाटक, इत्यादी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यायची काळजी या विषयी डॉ शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी भानुदास ढोबळे, शिरीष शहा, चंद्रशेखर कोरडे, राजश्री ढोबळे आदिंनी योगदान दिले.