पुणे – राजकारणामुळे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकारणाचे क्षेत्र खूपच प्रभावीत झाले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, सीबीआय आणि पार्लमेंटला सुद्धा त्यांच्या अधिकारांचा पूर्ण वापर करताना विचार करावा लागतो. अशा जात्यामध्ये माध्यमे कसे सुटू शकतील, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांकडून ज्या प्रकारे रिर्पोटिंग होत आहे त्यात शांती शोधणे अवघड आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या’ समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशितोष, प्रसिद्ध लेखक तथागत रॉय, तुघलकचे संपादक स्वामीनाथन गुरूमुर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) आणि लेखक राजीव मल्होत्रा हे उपस्थित होते.
तसेच, संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू प्रा. डी. पी. आपटे व अधिष्ठाता डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.