मेधा महोत्सवास ठाकरे, तटकरे, पवार, देशमुख येणार

संगमनेर – युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सव 17 जानेवारी रोजी होत आहे. यावेळी सकाळी 11 वाजता संवाद तरुणाईंशी या कार्यक्रमात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ना. आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धीरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या राजकारणातील तरुण पिढीची मुलाखत गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्‍वस्त शरयूताई देशमुख यांनी दिली.

अमृतवाहिनीमधील क्रीडा संकुलात हा महोत्सव होत आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्‍वस्त शरयूताई देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रकल्प प्रमुख प्रा. जी. बी. काळे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. बाबा लोंढे, प्रा. मनोज शिरभाते, एस. टी. देशमुख, प्राचार्या जे. बी. सेठ्ठी, प्राचार्या शीलत गायकवाड, प्रा. विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, राकेश रंजन हे महोत्सवाचे नियोजन करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)