यांत्रिकीकरणामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत

इंदोर – भारतात शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे जॉन डियर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश नाडीगर यांनीं सांगितले.
त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतात ट्रॅक्‍टर आणि मशागतीची विविध उत्पादने सादर करीत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सतीश पुढे म्हणाले, आम्ही नवोन्मेषांचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे अशी सरकारचीही इच्छा आहे. ही उत्पादने शेतकऱ्यांना, कंत्राटी शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना मदत करतील. आमच्या वित्तीय सेवा पारदर्शक, वेगवान व सोयीस्कर आहेत आणि आमच्या ग्राहकांना हेच हवे असते, असे विक्री विभागाचे संचालक राजेश सिन्हा म्हणाले. भारतीय बाजारपेठेत आधुनिक तंत्रज्ञान आणणे आवश्‍यक आहे, असे कंपनीच्या लोकसंपर्क विभागाचे संचालक मुकुल वार्ष्णेय म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.