हॉटेलमध्ये जेवण ते मोफत बियर; वाचा जगात लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या हटके योजना

वाशिंग्टन – करोना महामारी त्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आता बाकी राहिला असल्याने भारतासह जगात सर्वत्रच या लसीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांनी आपण होऊन पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी जगातील बहुतेक देशांनी प्रोत्साहन  योजनांची घोषणा केली आहे. अनेक देशांमध्ये सरकार आणि काही खाजगी कंपन्या लोकांनी लसीकरण  करण्यासाठी पुढे यावे म्हणून योजनांची घोषणा करत आहेत.

त्यामध्ये हॉटेलमध्ये मोफत जेवण किंवा बियर पार्लरमध्ये मोफत बियर अशा  प्रकारचा योजनांचा समावेश आहे चीनमधील हेनान  प्रांतातील स्थानिक सरकारने जे लोक लसीकरण करून घेणार नाहीत त्यांना कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली आहे तर मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही असा इशारा दिला जात आहे.

अमेरिकेत काही खाजगी कंपन्यांनी लसीकरण करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देतानाच रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे लसीकरण सेंटरपर्यंत जाण्यासाठी प्रवासी भाडे भत्ता म्हणून 30 डॉलर्स  म्हणजेच बावीसशे रुपये दिले जात आहेत.

अमेरिकेतील  प्रख्यात डोनट कंपनी क्रिस्पी क्रीम ने लसीकरण करून घेणाऱ्यांना 2021 च्या अखेरपर्यंत दररोज एक डोनट मोफत देण्याची घोषणा केली आहे  मिशिगन या राज्यांमध्ये मार्जुना  म्हणजेच गांजा  विकणाऱ्या एका कंपनीने लसीकरण करून घेणाऱ्यांना गांजा देण्याचेही आमिष दाखवले आहे

चीनमधील बीजिंग येथे लसीकरण करून बाहेर पडणाऱ्या लोकांना आईस्क्रीम फ्री  दिले जात आहे इस्त्रायलमध्ये अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लसीकरण करून आलेल्या लोकांना मोफत खाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारताचाही राजधानी दिल्लीत पुरानी दिल्ली परिसरामध्ये आणि कनॉट प्लेस या परिसरामध्ये लसीकरण करून घेणाऱ्या ग्राहकांना जेवणाच्या दरामध्ये पंचवीस ते तीस टक्के सूट दिली जात आहे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये जगात सर्वत्रच लसीकरणाची मोहीम सुरू झाली असली तरी त्याला मिळणारा प्रतिसाद अद्यापही कमी आहे.

आत्तापर्यंत फक्त नऊ टक्के लोकांनी लसीकरण करून घेतले आहे म्हणूनच अशा प्रकारची योजना ची घोषणा सरकारी पातळीवर आणि खाजगी पातळीवर करावी लागत आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.