फ्लोरिडा– कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉटेल व्यावसाय थंड पडला. या व्यवसायाला आर्थिक फटका बसलेल्या काळात एका व्यक्तीने तब्बल ७ लाख रुपये टीप म्हणून दिले. हॉटेलचं बिल १४०० रुपये आलं होतं. मात्र जाताना त्या व्यक्तीने हॉटेल स्टाफला 7 लाखाची टीप दिली. अशी घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडली आहे.
फ्लोरिडा मधील वाहो सीफुड ग्रील या हॉटेलमध्ये अनेक दिवसांनंतर आलेल्या ग्राहकाने जेवण ऑर्डर केलं. मनसोक्त जेवन केलं. मात्र जेव्हा बिल देण्याची वेळ आली. तेव्हा हॉटेल मालकापासून ते स्टाफपर्यंत सगळे अवाक झाले होते. हॉटेलचं बिल १४० युरो म्हणजेच जवळपास १४०० रुपये आलं होतं. त्यावेळी संपुर्ण बिल भरल्यानंतर त्या ग्राहकाने स्टाफसाठी थेट ७ लाख रुपयांनी टीप ठेवली.
ही संपुर्ण घटना हॉटेल मालकाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं बिलही अटॅच केलं आहे. “या व्यक्तीने आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित केलं. वर्षभर या इंडस्ट्रीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगलं गेलं नाही, पण या घटनेनंतर माणुसकीवरील विश्वास अधिक वाढला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.”असं त्या मालकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
या ग्राहकाचा हा प्रकारपाहून या हॉटेलमध्ये काम करणारा स्टाफ भावूक झाला. त्या ग्राहकाने केवळ पैसेच दिले नाही तर पैशाचा किती वाटा कोणी कसा वाटून घ्यायचा हे देखील समजावून सांगितलं. प्रत्येकी ७५ हजार घ्या,असं सांगताच सगळा स्टाफ आवाक झाला. या घटनेवर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसला नाही. कोरोना काळात अशा प्रकारे कामाची पोचपावती मिळाल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.