#Video : सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहताच महाशय धर्मपाल गुलाटींना अश्रू अनावर

नवी दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी सुषमा स्वराज यांचे पार्थिव बुधवारी 12 ते 3 यावेळी भाजपच्या मुख्यालात ठेवण्यात आलं होतं. यावेळी एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनीही स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रध्दाजंली वाहिली. यावेळी गुलाटी हे अत्यंत भावूक झाले होते. सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते रडायला लागले. त्यानंतर आजुबाजुच्या लोकांनी त्यांना सावरले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाचं व्हायरल झाला आहे.

एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी अनेकदा जाहिरातीत ही दिसतात. यांचे वय 96 वर्षे आहे. एमडीएच मसाले उद्योग त्यांनीच उभा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.