एमसीएच्या अभिषेकची दमदार खेळी

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात संयुक्त क्‍लब संघाने पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीविरुद्ध 172 धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले. तर, दुसऱ्या सामन्यात पहिल्या दिवशी एमसीए संयुक्त जिल्हा संघाने अभिषेकच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिवसअखेर 57 षटकात 5 बाद 182 धावा केल्या.

या स्पर्धेत दोन दिवसांच्या लढतीतील सामन्यात पहिल्या दिवशी संयुक्त क्‍लब संघाला 54.1 षटकांत 233 धावापर्यंत मजल मारता आली. यात मिहीर किल्लेदार 62, नचिकेत वेर्लेकर नाबाद 70, रोहित हडके 37, शिवम ठोंबरे 31 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉककडून यश जागडे (4-13), हर्षवर्धन पवार (3-43) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघ 27.5 षटकांत अवघ्या 61धावावर संपुष्टात आला. यामध्ये अद्वैत मुळ्येने सर्वाधिक 30 धावा केल्या. संयुक्त क्‍लबकडून सोहेल शेख (5-15), वरून नेने (4-4), रोहित हडके (1-9) यांनी भेदक गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळवून दिली. संयुक्त क्‍लब व व्हेरॉक यांच्यातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

पहिल्या डावात आज दिवसअखेर एमसीए संयुक्त जिल्हा संघाने 57 षटकात 5 बाद 182 धावा केल्या. यात वेंकटेश काणे 38, सौरभ गढक 34, सनतकुमार माळगे 18, प्रथमेश बजाज 17 यांनी धावा केल्या. अभिषेक पवार नाबाद 55 धावा, तर ओंकार मोहिते नाबाद 7 धावांवर खेळत आहे. डेक्कन जिमखानाकडून आर्यन बांगले (2-39), श्‍लोक धर्माधिकारी (2-50), रेहान खान (1-53) यांनी सरस गोलंदाजी केली. एमसीए संयुक्त जिल्हा संघ व डेक्कन जिमखाना यांच्यातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.