एमबीए, बीबीए अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट सायन्सेस विभागाच्या (पुम्बा) एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए, एमबीए फार्मा बायोटेक्‍नॉलॉजी आणि बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट अशा तीन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी सेलमार्फत होणार आहे.

पूम्बातील एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम हा नोकरदार वर्गामध्ये प्रसिद्ध आहे. आयटी कंपन्या, उत्पादन उद्योग, मध्यम स्वरुपाचे उद्योग आदींमध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात.

दोन वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमाला तीन वर्षे व्यवस्थापनाचे काम करण्याचा अनुभव असणारे, अधिकारी-कर्मचारी प्रवेश घेण्यासाठी पात्र असतात. त्याचप्रमाणे पूम्बामध्ये बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जुलै 2018 मध्ये सुरू झाला. या दोन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश हे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहेत. या प्रवेशाची सर्व सविस्तर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.