मुंबई- अभिनेत्री मयूरी देशमुखच्या पतीने काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली. त्यानंतर बरेच दिवस ती सोशल मीडियापासून दूर होती. त्याच्या मृत्यूमुळे मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला. डिप्रेशनमुळे त्याने असा टोकाचा निर्णय घेतला अशा चर्चा रंगल्या होत्या.
आशूतोषच्या तब्येतीची किंवा डिप्रेशनची अवस्था मयूरीने जवळून बघितली होती. तिच्याबरोबरच त्या दोघांची मैत्रीण श्वेता हिने सुद्धा या काळात दोघांना प्रचंड प्रमाणात मदत केली. याच काळात मानसिकदृष्टयाच नाही तर शारिरीक दृष्टया त्याला पाठिंबा दिला होता.
मैत्रीण श्वेताच्या वाढदिवसानिमित्त मयूरीने सोशल मीडियावर व्हीडियो पोस्ट केला आहे. श्वेताने आम्हाला प्रचंड प्रमाणात मदत केली. तिने फक्त सल्लेच दिले नाही तर ती मैदानात उतरुन ती आमच्यासोबत सदैव होती. दोघांंची लाडकी असलेली श्वेता तुला खूप धन्यवाद , असं तिने या व्हीडियोत म्हटलं आहे.
View this post on Instagram