पुणे : भाजप कडून विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातील कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत.
दरम्यान, भाजपने पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ स्वतः कडे ठेवले आहेत. कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. तर शिवसेनेला एकही उमेदवारी देण्यात आलेली नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीच्या वरिष्ठांकडे पुण्यात जागा सोडण्याची मागणी केली होती. परंतु भाजप सर्व जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत.