कोल्हापूर – शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासकीय हॉस्पिटल बरोबरच खाजगी हॉस्पिटलही अधिग्रहीत करण्यात येत आहेत. या हॉस्पिटलमधील डॉक्टारांच्या अडिअडचणी जानुन घेण्यासाठी व्हेबएक्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी संवाद साधला.
प्रारंभी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महापालिका शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटलच्या संपर्कात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेने सर्वाना मिळून लढायचे आहे. त्यासाठी महापालिका, जिल्हाप्रशासन व आपल्या सर्वाच्या समन्वयाने काम करुया.
आपल्या खाजगी हॉस्पिटलच्या काही अडचणी अथवा सुचना असतील तर त्या दयाव्यात. शहरातील खाजगी हॉटेलधारक कोव्हीड बाधीत रुग्णांना हॉटेल उपलब्ध करुन देण्यास तयार आहेत. यासाठी आपल्या हॉस्पिटलशी एखादे हॉटेल टाईप करुन अल्प दरात सेवा उपलब्ध करुन दयावी असे आवाहन केले. ज्याचा स्वतंत्र बंगला आहे अथवा स्वतंत्र रहाण्याची व्यवस्था आहे त्याठिकाणी घरीच आपल्या देखरेकी खाली रुग्णांवर उपचार करावे. त्यामुळे क्रिटीकल रुग्णासाठी बेड उपलब्ध होऊन हॉस्पिटल मध्ये उपचार करता येतील. शहरातील बरेचशे हॉस्पिटल कोरोना रुग्णासाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सर्वानी मिळून चांगली सेवा शहरवाशीयांना दयावी. महापालिकेला सर्वाच्या सहकार्याची गरज आहे. प्रत्येक प्रभागामध्ये असेासिएशनने दोन डॉक्टर उपलब्ध करुन दयावेत. आपल्या हॉस्पिटलमधील कर्मचा-याची काळजी घ्या त्यांना प्रोत्साहीत करा असे सांगितले. डॉ.अशोक भूपाळे यांनी बोलतांना महापालिका सर्व हॉस्पिटलना सहकार्य करत आहे. नियमांचे पालन करुन रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
डॉ.भारत कोतेेकर म्हणाले महापालिकेने प्रायव्हेट हॉस्पिटलच्या कच-याचा व इतर गेले तीन चार वर्षापासूनचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावलेले आहेत. यासाठी प्रशासनाने चांगला पुढाकार घेतलेला आहे. प्रभागातील स्थानीक डॉक्टरांशी प्रभागातील समितीने समन्वय ठेवावा. पदाधिकारी, प्रशासन व खाजगी डॉक्टर्स यांच्या मध्ये समन्वय आहे. या संकट काळात डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ जीवाची बाजी लावून काम करत आहे. त्यांना त्यांच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये असे सांगितले.
डॉ.जेनेʉारी कपाले म्हणाल्या हॉस्पिटलमध्ये ऍ़डमीट असणारा पेशंन्ट पॉझिटीव्ह आला तर त्याला कोठे पाठवायचे याचे नियोजन हावे. हॉस्पिटल जर प्रतिबंधीत क्षेत्रात आले. तर इतर पेशन्ट शिप्ट करतांना अडचणी येत आहेत. त्याठिकाणी बॅरेकेटींग लावले मुळे इतर पेशंन्टना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी सहकार्य मिळावे.
डॉ.आबासाहेब शिर्के, डॉ.अर्जुन अडनाईक, डॉ.अमोल खोत यांनीही आपल्या सुचना यावेळी मांडल्या.
महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी बोलतांना याबैठकी मध्ये सर्वानी सुचना दिल्याबद्दल आभार मानले. शहरातील डॉक्टर्स, पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवणेसाठी प्रशासनाला वॉट्सअप ग्रुप तयार करण्याच्या सुचना केल्या.
प्रत्येक दवाखाण्यामध्ये महापौर व आयुक्ताचे जनजागृतीपर आवाहनाचे बोर्ड देऊ. पॉझिटीव्ह रुग्ण आढणा-या भागामध्ये प्रतिबंधीत क्षेत्र केले नंतर त्या क्षेत्रातील हॉस्पिटल सुरु राहतील याची दक्षता घ्यावी. याठिकाणचे हॉस्पिटल संबधीतांनी सुरु ठेवावेत. महापालिकेच्यावतीने खरेदी करण्यात येत असलेल्या ऍ़म्ब्युलन्स तातडीन वापरात आणून त्यापैकी एक ऍ़म्ब्युलन्स खाजगी दवाखान्याच्या वापरा करीता उपलब्ध करुन दयावी. ऍ़म्ब्युलन्स कमी पडत असल्यास प्रशासनाने भाडे तत्वावर उपलब्ध करुन घ्याव्यात. सर्व डॉक्टरांनी आपली काळजी घ्यावी. आपल्या स्टाफच्या सुरक्षीततेची काळजी घ्यावी. आपल्या कर्मचा-यांमध्ये जनजागृती करुन त्यांना प्रोत्साहीत करावे.
सर्वानी सुरक्षीत पीपीई किट घालून काम करावे असे सांगितले. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना आपण सर्व डॉक्टर्स आहात आपल्याला कुठल्याही प्रतिबंधीत क्षेत्रात अडवले जाणार नाही. अथवा आपले हॉस्पिटल बंद ठेवले जाणार नाही. आपला स्टाफ घरी जाण्यासाठी घाबरत कामवार येत नसेल तर त्यांना मोटीवेट करा. त्यांना एकाच ठिकाणी राहण्यासाठी जी काही मदत लागेल ती प्रशासन करेल असे सांगितले.
यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, डॉ.अमित माने, डॉ.अमोल खोत, डॉ.दिपक पाटील, डॉ.अभ्यंकर, डॉ.अजित पाटील, डॉ.अर्चना पवार, डॉ.श्रीकांत कुलकर्णी, डॉ.उल्हास दमाले, डॉ.वैभव मधाळे आदी उपस्थित होते