माझ्यापेक्षा युतीचा विजय अधिक महत्त्वाचा-मायावती 

नवी दिल्ली – बसपा (बहुजन समाज पार्टी) च्या सर्वेसर्वा मायावती यांने लोकसभा निवड्‌णूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माझ्या वैयक्तिक विजयापेक्षा युतीचा विजय अधिक महत्त्वाचा असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. माझ्यापुरते बोलायचे, तर मी कधीही निवडणूक जिंकून लोकसभेत जाऊ शकते असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

लोकसभा निवडणूक न लढवण्यामागे पंतप्रधानपदाचे डावपेच आहेत का? या प्रश्‍नाला उत्तर देताना मायावती यांनी सांगितले, की आमची युती मजबूत स्थितीत आहे. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर काही तासातच मायावती यांनी सांगितले, की पंतप्रधान वा मंत्री बनल्यानंतर सहा महिन्यात लोकसभा वा राज्यसभेचा सदास्य बनणे आवश्‍यक असते. आणि मी पाहिजे तेव्हा पाहिजे त्या मतदार संघातून निवडून येऊ शकते.

मला फक्त नामांकत पत्र भरावे लागेल. बाकी सर्व काम आमचे लोकच करतील. जर मी आताच निवडणूक लढवली तर माझ्या मतदार संघात प्रचार करण्यासाठीच माझे लोक जात राहतील. परिणामी इतर मतदार संघांवर विपरीत परिणाम होईल, म्हणून मला आता निवडणूक लढवायची नाही. मी प्रथम उत्तर प्रदेशाची मुख्यमंत्री बनले, तेव्हा उत्तर प्रदेशाच्या कोणत्याही सदनाची सभासद नव्हते, असे चार वेळा लोकसभा सदस्य आणि चार वेळा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनलेल्या मायवती यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.