‘त्या’ वक्तव्यावरून मायावती अडचणीत

निवडणूक आयोगाने मागितला अहवाल 

साहारनपूर – साहरणपूर येथील देवबंद येथे आज समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि रालोदच्या जाहीर सभेत मायावती यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. तसेच काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना मायावती यांनी, उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाला टक्कर देऊ शकत नाही, कारण उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस कमजोर झाल्याचे त्या म्हणाल्या होत्या. या प्रचार सभेत मायावती यांनी थेट मुस्लिमांना संबोधित करत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष यांचे गठबंधनच भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश मध्ये रोखू शकते, असे म्हंटले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.

काँग्रेस पक्ष हा आम्ही जिंकलो नाही तरी चालेल, पण गठबंधनला सुद्धा जिंकून द्यायचे नाही, अशा पद्धतीने काँग्रेस वागत असल्याचे सांगत मुस्लिम समाजाला मायावतींनी महाआघाडीलाच मत देण्याचे आवाहन केले होते. यामुळे मायावतींच्या या भाषणाची दखल घेत निवडणूक आयुक्तांनी स्थानिक प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.