राहुल गांधींच्या किमान वेतन योजनेवर मायावतींची टीका

file photo

लखनौ : देशात आपला पक्ष सत्तेवर आल्यास सर्व गरींबासाठी किमान वेतन योजना आपण सुरू करू अशी जी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे त्यावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी टीका केली आहे. ही योजना गरीबांसाठी अच्छे दिन किंवा गरीबी हटाव योजनांसारखा थट्टेचा विषय ठरता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांना देशात ही योजना खरोखरच लागू करायची असेल तर प्रथम त्यांनी त्यांची सरकारे असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश पंजाब अशा राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करावी म्हणजे लोकांचा त्यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास बसेल अन्यथा अन्य कोणाचा त्यावर विश्‍वास बसणार नाहीं असे त्या म्हणाल्या. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा करण्यात आल्यामुळे त्याच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे असे त्या म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या देशातील गरीबांनी अच्छे दिन येतील आणि गरीबी हटाव अशा घोषणा याआधी ऐकल्या होत्या पण त्यातून त्यांचा भ्रमनिरासच झाला आहे. भारतीय जनता पक्षानेही गरीबांच्या खात्यात प्रत्येकी पंधरा लाख रूपये भरतो म्हणून त्यांची थट्टा केली होती असेही मायावती यांनी नमूद करीत भाजपवरही शरसंधान साधले आहे. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी अशा फसव्या घोषणा या आधी खूप प्रमाणात केल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. लोकांनी गेल्या 72 वर्षात या दोन्ही पक्षांचे कारभार बघितले आहेत त्यामुळे त्यांनी आता बहुजन समाज पक्षाच्याच पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)