मायावतींना पडू लागली पंतप्रधानपदाची स्वप्न

लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज येथील एका प्रचारसभेत बोलताना आपली पंतप्रधानबनण्याची सुप्त इच्छा अप्रत्यक्षबोलून दाखवली. त्या म्हणाल्या की सर्व काही मनासारखे घडले तर मला पंतप्रधान झाल्यावर आंबेडकरनगर लोकसभा मतदार संघातूनच निवडणूक लढवावी लागेल. त्यावेळी मी आंबेडकरनगर मतदार संघाखेरीज अन्य कोणत्याहीं मतदार संघाचा विचार करणार नाही. राष्ट्रीय राजकारणाचा रस्ता आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातूनच जातो असे त्या म्हणाल्या. मोदींचा जमाना आता संपला असून आता जयभीम बोलणारांचा जमाना सुरू होणार आहे असे त्या म्हणाल्या.

63 वर्षीय मायावती यांनी अकबरपुर मतदार संघातून चार वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. या मतदारसंघाची विभागणी होऊनच नंतर आंबेडकरनगर मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. सध्या त्या लोकसभेच्या निवडणूक रिंगणात नाहीत. पण वेळ पडल्यास आपण मला हवी त्या ठिकाणच्या खासदाराचा राजीनामा घेऊन तेथून निवडणूक लढवू असे त्यांनी म्हटले होते. त्या म्हणाल्या की गठबंधनच देशातील नवीन पंतप्रधान ठरवणार आहे. आणि महिलावर्गातील उमेदवारच पंतप्रधान झाल्यास मला विशेष आनंद होईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.