शिक्रापूर : (ता. शिरुर) येथील राहुल चातुर या शिक्षकाने मायेची ऊब फाउंडेशन स्थापन करुन दहा वर्षापासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल चातुर व कल्याण कोकाटे हे हिवाळ्यामध्ये उबदार कपडे वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्त केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राहुल चातुर या शिक्षकाने स्थापन केलेल्या मायेची ऊब फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्यातील गणेशखिंड येथे बालकांना उबदार कपडे व साहित्य वाटप वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे, जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, शिरूर तालुकाध्यक्ष अशोक कर्डिले, खेड तालुकाध्यक्ष नारायण करपे, शिक्षक पतसंस्थेचे सभापती चंद्रकांत खैरे, केंद्रप्रमुख संजय सुतार, सुरेश नाईकरे, फाउंडेशनचे सदस्य युवराज थोरात, रामचंद्र नवले, खंडेराव होळकर, मुख्याध्यापक रामचंद्र शिंगाडे, संतोष मगर, रवींद्र निंबाळकर, संदीप शेलार उपस्थित होते. दरम्यान, गणेशखिंड परिसरातील ८० विद्यार्थ्यांना उबदार रजई, चादर, सॉक्स, कानटोपीचे वाटप करण्यात आले.
संजय नाईकडे म्हणाले की, शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक मायेची ऊब फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करीत असलेले कार्य प्रेरणा देणारे आहे. अनिल पलांडे म्हणाले की, पुढील वर्षापासून मायेची ऊब परिवाराच्या या उपक्रमाचे स्वरूप आणखी विस्तृत करुन विद्यार्थ्यांना स्वच्छता व शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.