पुणे – देशात कोरोनाची लाट अत्यंत घातक रूप घेत आहे. रोज नवा नकोसा जागतिक विक्रम कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने रचला आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून अनेक राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बधांचा फटका सर्व गोष्टींवर पडत आहे.
त्यातच ठरलेले विवाह हे पुढे ढकलण्याची वेळ काही जणांवर आली आहे. तरी काही हौशी नवरदेव या संकट परिस्थिती सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अश्याच लग्नाळुंसाठी मे महिन्यात लग्नाचे अनेक शुभ मुहूर्त आहे.
आपल्या विवाह हे एक असे कार्य आहे जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही तर दोन कुटुंबांना जोडते. म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून केल्या जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त मे महिन्यात येत आहे.
जाणून घेऊयात मे महिन्यातील कोणत्यादिवशी आहे खास शुभ मुहूर्त –
- 2 मे
- 4 मे
- 7 मे
- 8 मे
- 21 मे
- 22 मे
- 23 मे
- 24 मे
- 26 मे
- 29 मे
- 31 मे